अद्भुत ! रामायण ! सर्ग प्रथम -अर्थ सहित
श्रीरामसीतामाहात्म्यकथनोपक्रमः - ! श्री राम सीता महात्म्य वक्तव्य पहल !
Adbhut Ramayana Canto 1st - with Hindi meaning |
अद्भुत ! रामायण ! सर्ग प्रथम
तमसातीरनिलयं निलयं तपसा गुरुम् ।
वचसां प्रथमं स्थानं वाल्मीकिं मुनिपुङ्गवम् ॥ १ ॥
विनयावनतोभूत्वा भारद्वाजो महामुनिः ।
अपृच्छत्सम्मतः शिष्यः कृताञ्जलिपुटो वशी ॥ २ ॥
अद्भुत ! रामायण ! सर्ग प्रथम अर्थ सहित
तमसा नदीच्या तीरावर वास्तव्य करणारे तपस्वीजनांचे गुरु, वाणीचे प्रथम स्थान असलेले श्रेष्ठ मुनी वाल्मीकि त्यांना त्यांच्या आज्ञाधारक प्रिय शिष्य भारद्वाज मुनींनी नम्रपणे हात जोडून विचारले, १-२
रामायणमिति ख्यातं शतकोटिप्रविस्तरम् ।
प्रणीतं भवता यच्च ब्रह्मलोके प्रतिष्ठितम् ॥ ३ ॥
श्रूयते ब्रह्मणा नित्यमृषिभिः पित्तृभिः सुरैः ।
पञ्चविंशतिसाहस्रं रामायणमिदं भुवि ॥ ४ ॥
अर्थ सहित
हे महामुनी - शेकडो कोटी श्लोकांमध्ये ज्या रामायणाचा विस्तार झाला आहे, त्यावर आपण संस्कार केले आहेत,
असे रामायण ब्रह्मलोकात प्रतिष्ठित झाले आहे. ब्रह्मा, ऋषी, पितृगण आणि देवता ज्याचे नित्य श्रवण करतात; ज्यामधून या पृथ्वीवर 25 सहस्त्र रामायणाची निर्मिती झाली ती आम्ही ऐकली आहे. ३-४
तदाकर्णितमस्माभिः सविशेषं महामुने ।
शतकोटिप्रविस्तारे रामायणमहार्णवे ॥ ५ ॥
अर्थ सहित
हे सुव्रत, शतकोटी विस्तार असलेल्या रामायणरूपी महासागरात कोणती विशेष गोष्ट सांगितली आहे, कोणती कथा अंतर्भूत आहे, ते मला सांगा. ५
किं गीतमिह मुष्णाति तन्मे कथय सुव्रत ।
आकर्ण्यादरिणः पृष्ठं भारद्वाजस्य वै मुनिः ॥ ६ ॥
हस्तामलकवत्सर्वं सस्मार शतकोटिकम् ।
ओमित्युक्त्वा मुनिः शिष्यं प्रोवाच वदतां वरम् ॥ ७ ॥
अर्थ सहित
मुनिश्रेष्ठ भरद्वाजाचे बोलणे ऐकून ऋषिवर यांना हस्तामलकाप्रमाणे म्हणजे तळहातावर ठेवलेला आवळा ज्याप्रमाणे स्पष्ट दिसतो, त्याप्रमाणे, शतकोटी रामायणाचे स्मरण झाले आणि ’तथास्तु’ असे म्हणून, ते आपल्या शिष्याला पुन्हा म्हणाले - भरद्वाजा चिरंजीव हो. आज आम्हाला तू एका चांगल्या गोष्टीची आठवण करून दिलीस. ६-७
भारद्वाज ! चिरञ्जीव साधु स्मारितमद्य नः ।
शतकोटिप्रविस्तारे रामायणमहार्णवे ॥८ ॥
रामस्य चरितं सर्वमाश्चर्यं सम्यगीरितम् ।
पञ्चविंशतिसाहस्रं भूलोके यत्प्रतिष्ठितम् ॥ ९ ॥
नृणां हि सदृशं रामचरितं वर्णितं ततः ।
सीतामाहात्म्यसारं यद्विशेषादत्र नोक्तवान् ॥ १० ॥
अर्थ सहित
शतकोटी विस्तार असलेल्या रामायणरूपी महासागरात सर्वात आश्चर्यकारक असे रामाचे चरित्र पूर्णपणे कथन केले आहे. त्यामध्ये एखाद्या मानवाप्रमाणे रामाच्या चरित्राचे वर्णन केले असून सीतेचे माहात्म्य मात्र फारसे सांगितलेले नाही. ८-१०
शृणुष्वावाहितो ब्रह्मन् ! काकुत्स्थचरितं महत् ।
सीताया मूलभूतायाः प्रकृतेश्चरितञ्च यत् ॥ ११ ॥
अर्थ सहित
हे ब्रह्मन् ! महान अशा रामचरित्राचे सावधानपणे श्रवण कर. मूल प्रकृती असलेल्या सीतेचे ते चरित्र आहे. ११
आश्चर्यमाश्चर्यमिदं गोपितं ब्रह्मणोगृहे ।
हिताय प्रियशिष्याय तुभ्यमावेदयामि तत् ॥ १२ ॥
अर्थ सहित
सर्वांत आश्चर्यकारक असे हे जे चरित्र, ब्रह्माच्या गृहामध्ये बंदिस्त आहे. ते मी तुझ्या सारख्या माझ्या शिष्याला त्याच्या हितासाठी कथन करतो. १२
जानकी प्रकृतिः सृष्टेरादिभूता महागुणा ।
तपःसिद्धिस्स्वर्गसिद्धिर्भूतिमूर्तिमतां सती ॥ १३ ॥
अर्थ सहित
मूळ प्रकृतीरूप अशी जानकी सृष्टीची आदिरूप असून महान् गुणवती आहे. त्याचप्रमाणे तपःसिद्धी प्राप्त, स्वर्गसिद्धी प्राप्त अशी मूर्तिमंत सती आहे. १३
विद्याविद्या च महती गीयते ब्रह्मवादिभिः ।
ऋद्धिः सिद्धिर्गुणमयी गुणातीता गुणात्मिका ॥ १४ ॥
अर्थ सहित
विद्या-अविद्येच्या रूपाने ब्रह्मवादी तिचे गुणगान करतात. ती ऋद्धी-सिद्धी युक्त असून गुणवती. परंतु सामान्य गुणांच्या पार अशी आहे. १४
ब्रह्मब्रह्माण्डसम्भूता सर्वकारणकारणम् ।
प्रकृतिर्विकृतिर्देवी चिन्मयी चिद्विलासिनी ॥ १५ ॥
अर्थ सहित
तिची निर्मिती ब्रह्मातून झाले असून सर्व मूलभूत गोष्टींचे ती मूळ आहे. तसेच ती शुद्धचैतन्यरूप, परमात्मस्वरूप, चिन्मयी, चिद्विविलासिनी असून निसर्ग (मूळरूप) आणि रूपांतराची श्रेष्ठ देवी आहे. तिच्यापासून बदल होण्यास प्रारंभ होतो. १५
महाकुण्डलिनी सर्पानुस्यूता ब्रह्मसंज्ञिता ।
यस्या विलसितं सर्वं जगदेतच्चराचरम् ॥ १६ ॥
अर्थ सहित
ती ब्रह्म या संज्ञेने युक्त असून यज्ञकुंडांनी (सर्व जगाला सामावून घेणारी), सर्वांना व्यापणारी आहे. हे सर्व चराचर तिचा केवळ विलास आहे. १६
यामाधाय हृदि ब्रह्मन् ! योगिनस्तत्त्वदर्शिनः ।
विघट्टयन्ति हृद्ग्रन्थिं भवन्ति सुखमूर्त्तिकाः ॥ १७ ॥
अर्थ सहित
जिला, म्हणजे ज्या जानकीला केवळ हृदयात धारण करून तत्त्ववेत्ते योगी आपल्या हृदयातील अज्ञान दूर करून सुखी होतात. १७
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति सुव्रत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदा प्रकृतिसम्भवः ॥ १८ ॥
अर्थ सहित
हे सुव्रता, जेव्हां जेव्हां धर्माचा ऱ्हास होतो, तेव्हां तेव्हां त्याच्या पुनरुत्थानासाठी प्रकृती निर्माण होते. (सृष्टीचे मूळरूप असलेल्या सीतेसारख्या स्त्रियांचा जन्म होतो). १८
रामः साक्षात्परं ज्योतिः परं धाम परः पुमान् ।
आकृतौ परमो भेदो न सीतारामयोर्यतः ॥ १९ ॥
अर्थ सहित
श्रीराम हा साक्षात तेज, कैवल्याचे परमधाम असून श्रेष्ठ पुरुष आहे. राम आणि सीता यांच्यामध्ये कोणताच भेद नाही. १९
रामः सीता जानकी रामभद्रो नाणुर्भेदो नैतयोरस्ति कश्चित् ।
सन्तो बुद्धातत्त्वमेतद्विबुद्धाः पारं याताः संसृतेर्मृत्युवक्त्रात् ॥ २० ॥
अर्थ सहित
राम - सीता - जानकी - रामभद्र यांच्यामध्ये कोणताही भेद नाही. ज्ञानी लोक हे तत्व समजून घेतात आणि मृत्यूच्या जबड्यातून व जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतात. २०
रामोऽचिन्त्यो नित्यचित्सर्वसाक्षी सर्वान्तःस्थः सर्वलोकैककर्त्ता ।
भर्त्ताहर्त्ताऽऽनन्दमूर्त्तिर्विभूमा सीतायोगाच्चिन्त्यते योगिभिः सः ॥ २१ ॥
अर्थ सहित
राम हा सर्वसाक्षी. तो म्हणजे शुद्धचैतन्य आणि अचिंत्य(कोणत्याही प्रकारे शंका नसलेला) असा आहे. तो सर्व लोकांचा संग्रह करणारा असून सर्वांच्या अंतःकरणात वास करणारा आहे. सर्वांचा स्वामी आणि साक्षात आनंदाची मूर्ती आहे. अत्यंत श्रेष्ठ (विभूमा) व सितेसहित असलेल्या अशा रामाचे योगीजन सतत चिंतन करतात. २१
अपाणिपादो जवनोग्रहीता पश्यत्यचक्षुः सशृणोत्यकर्णः ।
स वेत्ति विश्वं नहि तस्य वेत्ता तमाहुरन्यं पुरुषं पुराणम् ॥ २२ ॥
अर्थ सहित
तो पायांच्या गतीशिवाय सगळीकडे संचार करतो. हातांच्या शिवाय सर्व काही धारण करतो. आणि नेत्रांशिवाय सर्व पाहू शकतो. तसेच कानांशिवाय सर्वकाही श्रवण करतो. सर्व विश्वाचे ज्ञान त्याला आहे. मात्र त्याला कोणीच जाणू शकत नाही. (त्याचे स्वरूप कोणालाच माहीत नाही.) म्हणून त्याला श्रेष्ठ व असाधारण असा पुराणपुरुष म्हणतात. २२
तयोः परं जन्म उदाहरिष्ये ययोर्यथाकारणदेहधारिणोः ।
अरूपिणो रूपविधारणं पुन-र्नृणां महानुग्रह एव केवलम् ॥ २३ ॥
अर्थ सहित
मी त्या दोघांच्या जन्माचे आणि ज्या कारणाने त्यांनी हा देह धारण केला, त्याचे वर्णन करून सांगेन. तो रूपरहित (अरूप) असूनही (मनुष्याचे रूप व गुण नसूनही) केवळ सामान्य जनांच्या हितासाठीच त्यांनी मनुष्यदेह धारण केला, हा महान अनुग्रहच. २३
पठन्द्विजोवागृषमत्वमीया-त्क्षत्रान्वयो भूमिपतित्वमीयात् ।
वणिग्जनःपण्यफलत्वमीया-च्छृण्वन्हि शूद्रोहि महत्त्वमीयात् ॥ २४ ॥
अर्थ सहित
याच्या पठणाने ब्राह्मणाला श्रेष्ठ वाणी, क्षत्रीयाला राज्यपद, वैश्याला उत्तम व्यापाराचे फल आणि शुद्रास महत्त्व प्राप्त होते. २४
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये अद्भुतोत्तरकाण्डे श्रीरामसीतामाहात्म्यकथनोपक्रमो नाम प्रथमः सर्गः ॥ १ ॥
श्रीरामसीतामाहात्म्यकथनोपक्रमः प्रथम सर्ग समाप्त ..
टिप्पणियाँ